Peoples Media Pune header

Go Back

स्व.दानशूर कृष्णा शेट्टी यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त रुग्णांना फळे वाटप

29 Sep 2017

पूर्वजांचा पुण्यस्मरण दिन धार्मिक विधींनी साजरा करण्याची भारतीय परंपरा आहे.मात्र स्व.दानशूर कृष्णा शेट्टी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अन्नदान,व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.स्व.कृष्णा शेट्टी यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पद्मकृष्ण फौंडेशनच्या वतीने कमलानेहरू रुग्णालयातील ५०० रुग्णांना फळेवाटप करण्यात आले.या प्रसंगी सदानंद शेट्टी(अध्यक्ष पद्मकृष्ण फौंडेशन),सुजाताताई शेट्टी(नगरसेविका),सहाय्यक आरोग्य प्रमुख वैशाली साबणे,आरोग्य अधिकारी श्री वावरे,पद्मकृष्ण फौंडेशनचे ट्रस्टी- प्रेमाताई शेट्टी,उमावती शेट्टी,सदाशिव शेट्टी,पुरुषोत्तम शेट्टी,साक्षात शेट्टी,अॅड.रमेश शेट्टी,अॅड.रोहन शेट्टी,आदी मान्यवरांच्या बरोबरच सदानंद शेट्टी मित्रपरिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी(मा.स्थायी समिती अध्यक्ष)यांनी पुण्यस्मरण दिनानिमित्त समाजाला उपयुक्त उपक्रम राबविणे हा या उपक्रमा मागचा हेतू असल्याचे सांगितले  

 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite