Peoples Media Pune header

Go Back

ह्युमॅनिटी फौंडेशन व पुणे पोलीस यांच्या वतीने महिलांसाठी मोफत कॉम्प्यूटर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

03 Oct 2017

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवसी ह्युमॅनिटी फौंडेशन व पुणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तेह्सीन पूनावाला यांच्या हस्ते करण्यात आले.झुबेदा हाईटस भाग्योदय नगर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ह्युमॅनिटी फौंडेशनचे अध्यक्ष कुमेल रजा,सचिव मुर्तुझा शेख,बहाउद्दीन शेख,प्रमुख पाहुणे तेह्सीन पूनावाला,अॅडी.एस.पी.सतीश गोवेकर,कोंढवा पोलीस स्टेशनचे मिलिंद गायकवाड,तसेच स्थानिक महिला व नागरिक उपस्थित होते.या प्रशिक्षण केंद्रात महिलांच्या २५ बॅचेसना प्रत्येकी ८० प्रमाणे तीन महिन्याचा बेसिक ऑफिस ऑटोमोशन व अन्य कोर्सचे मोफत शिक्षण दिले जाईल.दर दिवसी ८ बॅच प्रत्येकी १० महिलांच्या असतील.या प्रसंगी बोलताना तेह्सीन पूनावाला यांनी आधुनिक जगात सर्व काही जग तंत्रज्ञाना मुळे बोटांच्या टोकावर आले आहे,महिला,नोकरदार एव्हडेच नव्हे तर गृहिणीसुद्धा संगणक साक्षर झाली पाहिजे असे सांगितले.सतीश गोवेकर यांनी बोलताना एक महिला शिकली म्हणजे कुटुंब शिकले असे होते.तंत्रज्ञानाचा वापर चांगला व वाईट असा दोन्ही होतो,चांगल्या वापराने प्रगती होते असे सांगितले.कुमेल रजा यांनी स्वयंसेवी संस्था व पोलीस-प्रसाशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून आगामी काळात आजून उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले.यामागील संकल्पना सतीश गोवेकर यांची आहे.त्यांचे आभार.असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite