Peoples Media Pune header

Go Back

भाजप आमदाराच्या भावाची दमदाटी व गरीबाचे बांधकाम स्वता: उध्वस्त केले

04 Oct 2017

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन पुंडलिक टिळेकर यांनी नारायण नागोराव घोडके व वसंत चौगुले यांचे सर्वे नंबर ४६ येथील खाजगी मालमत्तेतील बांधकामाविषयी १ लाख रुपये खंडणी मागितली.ती न दिल्याने ३ ऑक्टोबर रोजी स्वत चेतन टिळेकर याने जेसीबीच्या सहाय्याने रात्री ते बांधकाम तोडून टाकले.यासंबधी.श्री घोडके व चौगुले यांनी कोंढवा  पोलीस स्टेशन येथे तक्रार केली.श्री चेतन टिळेकर हे भाजपचे पदाधिकारी असून ते आपल्या पदाचा व भाऊ आमदार योगेश टिळेकर व आई प्रभाग अध्यक्ष व स्थानिक नगरसेविका असल्याचा दुरुपयोग करून भागात दहशत माजवत आहेत.यामुळे परिसरातील नगरीकात दहशत असून याप्रकरणी पोलसांनी दबावात न येता सदरील व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सोबत :१)घटनास्थळाचा फोटो,२)तक्रार अर्ज झेरोक्स 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite