Peoples Media Pune header

Go Back

बढाईआळी मंडळाच्यावतीने कोजागिरी निमित्त मान्यवरांना पुरस्कार

06 Oct 2017

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने बढाई आळी मित्रमंडळ व अखिल कापडगंज मित्र मंडळाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा योगेश गोगावले(भाजप शहर अध्यक्ष)यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट,महापौर मुक्ताताई टिळक, शैलेश बढाई(आयोजक),अशोक येनपुरे(नगरसेवक),प्रमोद कोंढरे(कसबा सरचिटणीस),आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे जे.जे.चोकसी व रहेजा हँन्डलूम(व्यापार गौरव),डॉ.सत्यप्रेम चोले(डॉक्टर गौरव),पो.नि.राजेंद्र मोहिते,पो.नि.SMBHAJIEसंभाजीराव शिर्के,पो.नाईक दीपक वर्पे,पो.नाईक सतीश पठारे यांना पोलीस गौरव पुरस्कार,अॅड.म.वि.आकोलकर(वकील गौरव),पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल,श्रीफळ,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना योगेश गोगावले यांनी समाजात अनेक व्यक्ती आपल्या प्रोफेशनद्वारे उत्कृष्ट्र कामगिरी करीत असतात.त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा असे प्रतिपादन केले.या नंतर चेतन खापरे व उषा करंबेळकर यांनी अन्य कलाकारांसह विविध जुनी व नवी गीते व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.दुग्धप्राशन व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite