Peoples Media Pune header

Go Back

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक युवा शहर अध्यक्षपदी अब्दुल हाफिज यांची निवड.

07 Oct 2017

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याअल्पसंख्यांक विभाग युवा शहर अध्यक्ष या पदासाठी अब्दुल हाफिज यांची नियुक्ती करण्यात आली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली,मा.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष मा.हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांच्या आदेशाने व पुणे शहर अध्यक्षा खा.वंदनाताई चव्हाण व अल्पसंख्यांकविभाग अध्यक्ष इक्बाल शेख यांच्या संमतीने ही निवड करण्यात आली.सामान्य जनतेपासून ते नेत्यांपर्यन्त दांडगा जनसंपर्क तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर व युवा उद्योजक अशी ओळख असणारा हा युवक बांधकाम व्यवसायिक असून पुण्यामध्ये युवकांचे मोठे संघटन त्याने केले आहे.मा.खा.वंदनाताई चव्हाण,मा.दीपकभाऊ मानकर,मा.इक्बालभाई शेख,मा.इक्राम भाईजान मोहसीनभाई,चेतन तुपे,निलेश मगर,नाना लोणकर,बंडूअण्णा गायकवाड,योगेश ससाणे,अनिस सुंडके,हाजी गफूर पठाण,हाजी फिरोज,असिफ पटेल,अल्ताफ पिरजादे यांचे सहकार्य मिळाले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite