Peoples Media Pune header

Go Back

कर्णबधीर व्यक्तींनी बनविलेल्या “दीपावली वस्तू”च्या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन.-रोटरीचा उपक्रम

07 Oct 2017

कर्णबधीर व्यक्तींनी बनविलेल्या दिवाळीसाठीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे डहाणूकर कॉलनीतील किर्लोस्कर कमिन्स हॉल मध्ये उद्घाटन करण्यात आले.येथे फराळाचे जिन्नस,शोभिवंत पणत्या,शोभेच्या,पूजेच्या वस्तू असे सर्व काही एका छता खाली उपलब्ध आहे.चाळीस स्टॉल्स  आहेत.उद्घाटन प्रसंगी आयोजक रोटरी क्लब गणेशखिंडचे अध्यक्ष रो.अॅड.प्रमोद बेंद्रे,रोटरी सहवासचे अध्यक्ष दिनकर पळसकर,रोटरी हेरीटेजचे अध्यक्ष अमित मुंगळे,रोटरी पौडरोडचे अध्यक्ष दीप्ती पुजारी,रोटरी वारजेचे अध्यक्ष कुणाल प्रल्हादके,साद उपक्रम केंद्राच्या संचालिका विनया देसाई,सामाजिक कार्यकर्त्या कविता सदाशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रदर्शन व विक्रीची वेळ सकाळी १० ते रात्री ९ अशी आहे.विनया देसाई यांनी बोलताना या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.व दरवर्षी वाढत आहे असे सांगितले.

छायाचित्र :प्रदर्शन पाहताना व खरेदी करताना मान्यवर व नागरिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite