Peoples Media Pune header

Go Back

परदेशी विद्यार्थ्यांनी खेळला गरबा व दांडिया

09 Oct 2017

गरबा व दांडिया भारतीय उत्सव परंपरेत महत्वाचे स्थान मिळवून आहे.याची ओळख परदेशी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी रोटरी क्लब सहवासच्या वतीने त्यांच्यासाठी गरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले.क्षिप्रा सहवास हॉल येथे आयोजित दांडियात १४ परदेशी विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.यात अमेरिका,ब्राझील,आर्जेन्टिना व अन्य देशाचे विद्यार्थी होते.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी सहवासचे अध्यक्ष रो.दिनकर पळसकर,युथ डायरेक्टर सुनील बारसकर,सेक्रेटरी अनिल जाधव,कार्यक्रम संयोजक ममता पटेल,श्रद्धा पळसकर,श्वेता बारसकर,अमृता डेकाटे,क्रांती शहा आदी मान्यवरांच्या बरोबर रोटरी सदस्य उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite