Peoples Media Pune header

Go Back

राष्ट्रवादी काँग्रेस युवा अल्पसंख्यांक शाखांचे अजितदादा पवारांच्या हस्ते उद्घाटन

09 Oct 2017

राष्ट्रवादी काँग्रेस युवा अल्पसंख्यांक विभाग पुणे शहरच्या वतीने सभासद नोंदणी अभियान व वॉर्ड तिथे शाखा उपक्रम राबविण्यात आला आहे.या अंतर्गत साळुखे विहार शाखा नं १ व २,तसेच एनआयबीएम रोड शाखा ३ व ४ चे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी ख.वंदनाताई चव्हाण,सेलचे अध्यक्ष इकबाल शेख,अल्पसंख्यांक युवा शहर अध्यक्ष अब्दुल हाफिज,नाना लोणकर,चेतन तुपे,नंदाताई लोणकर,निलेश मगर,रुपालीताई चाकणकर,मनालीताई,अनिस सुंडके,रईसभाई,हाजीफिरोज गफूर पठाण,संजय घुले,राकेश कामठे,राहुल लोणकर,संजय लोणकर,मजहर खान,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाला देहूरोड,पिंपरी चिंचवड,हडपसर,कोंढवा व श्रातील विविध भागातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी अजितदादांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.कार्यक्रमाचे मार्गदर्शन सेलचे राजूभाई,अमजदभाई,असिफभाई,शबानामॅडम,समीनामॅडम यांनी केले.कार्यक्रमासाठी सलमान सय्यद,रियाझ शेख,झकीर नदाफ,मुजम्मील शेख,व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.शहरामध्ये ज्याज्या ठिकाणी अल्पसंख्यांक समाज आहे त्या त्या ठिकाणी शाखा उभारणार असल्याची माहिती युवा अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अब्दुल हाफिज यांनी दादांना दिली.यावेळी दादांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite