Peoples Media Pune header

Go Back

क्विल्स एन कल्टसच्या वतीने दिवाळीसाठी कागदी वस्तूंचे प्रदर्शन

13 Oct 2017

क्विल्स एन कल्टस या महिलांच्या संस्थेद्वारे दिवाळीसाठी लागणा-या विविध वस्तू कागदाच्या सहाय्याने बनवून प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.यात विविध आकर्षक दिवे,आकाशकंदील,महिरप,लाकडाच्या दिव्यांवर कागदापासून नक्षीकाम,फ्रीज मॅग्नेट,फोटोफ्रेम व अन्य शोभिवंत व इकोफ्रेंडली वस्तू आहेत.याचे उद्घाटन लेखक व दिग्दर्शक वरुण नार्वेकर(मुरंबा फेम)यांच्या हस्ते करण्यात आले.बालगंधर्व रंगमंदीर प्रदर्शन हॉल येथे झालेल्या या उद्घाटन प्रसंगी  क्विल्स एन कल्टसच्या राजश्री होनराव,ममता पटेल,नेहा बागडे,अनिता कराडकर आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.हे प्रदर्शन १३.१४.व १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ९ या वेळेत खुले राहील.या प्रसंगी बोलताना राजश्री होनराव यांनी क्विल्स एन कल्टस संस्थेत १८ ते ७५ वयोगटाच्या महिला आहेत.संस्थेचे हे ७ वे वर्ष आहे.असे सांगितले तसेच प्रदर्शन ठिकाणी कागदीवस्तू बनविण्याचे प्रशिक्षणही देण्यात येते असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite