Peoples Media Pune header

Go Back

मेघा कानिटकर यांना महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

13 Oct 2017

मेघा कानिटकर(शिक्षक)एमआयटी संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय,कोथरूड यांना पुणे महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.बालगंधर्व रंगमंदीर येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक,स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे,कथक नृत्यांगना मनीषा साठे,महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.शाल,श्रीफळ,मानचिन्ह,व टॅबलेट असे पुरस्काराचे स्वरूप होते,

    पुणे महापालिकेने प्रथमच ऑनलाईन मूल्यमापनपद्धतीचा अवलंब करून राज्य पुरस्कार पद्धतीचे निकष लावून २० शिक्षकांना यासाठी निवडले होते.मेघा कानिटकर यांना यापूर्वी विविध राज्यस्तरीय व अन्य पुरस्कार मिळाले आहेत.त्या अभ्यासू असून २००९ साली त्यांची महाराष्ट्रातून नवी दिल्ली येथे बालचित्रवाणीतर्फे प्रशिक्षणासाठी निवड झाली होती 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite