Peoples Media Pune header

Go Back

शिवसेनेच्या वतीने स्वस्त फराळ विक्री केंद्राचे महादेव बाबर यांच्या हस्ते उद्घाटन

14 Oct 2017

शिवसेना कसबापेठ शाखेच्या वतीने अलोकनगरी,पवळेचौक येथे स्वस्त फराळ विक्री केंद्राचे उद्घाटन मा.आ महादेव बाबर(सहसंपर्क प्रमुख)यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी गटनेते संजय भोसले,आयोजक अनिल जाधव(शाखाप्रमुख),राजेंद्र शिंदे(मा.उपशहर प्रमुख),पल्लवी जावळे(नगरसेविका),विशाल धनवडे(नगरसेवक),संतोष भूतकर,बकुळ डाखवे,मकरंद पेठकर,जयश्री भणगे,हनुमंत दगडे,आदी मान्यवरांच्या बरोबरच प्दाधीकारो,शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.या केंद्रावर मोतीचूर लाडू,बेसन लाडू,चकली,चिवडा,कागदीपोहे चिवडा,शंकरपाळे,अनारसे,करंजी असे फराळाचे जिन्नस स्वस्त दरात उपलब्ध आहे.या प्रसंगी बोलताना महादेव बाबर यांनी शिवसेना विविध समाजोपयोगी उपक्रम नेहमी राबवीत असते.गेली १९ वर्ष याठिकाणी असे केंद्र सुरु आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे सांगितले.अनिल जाधव यांनी बोलताना नोकरदार,व कामकरी महिलांना फराळ तयार करण्यास वेळ नसतो.यासाठी हा उपक्रम राबवीत असून उत्तम प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite