Peoples Media Pune header

Go Back

पुना मर्चंट चेंबरच्या स्वस्त लाडू चिवडा विक्री केंद्रास आ.डॉ नीलमताई गो-हे यांची भेट

16 Oct 2017

शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी आज पुना मर्चंट चेंबरच्या आग्रही विनंतीवरून दिवाळीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या स्वस्त दरात लाडू चिवडा विक्री केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या या स्वदिष्ट व रुचकर पदार्थ बनविण्याची प्रक्रिया समजून घेतली.यावेळी हे पदार्थ बनविणा-या महिलांशी संवाद साधला.या केंद्रात १ लाख लाडू व १ लाख किलो चिवडा बनविण्याचे नियोजन आहे.पुणे शहरातील व्यापारी वर्गाने सामाजिक भान ठेवून गेली अनेक वर्ष सुरु असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.या उपक्रमाने सामन्यांची दिवाळी अधिक गोड होणार असल्याने शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी मर्चंट चेम्बरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल,सदस्य मिठूलाल ओसवाल,विजय मुथा,स्री आधार केंद्राच्या विश्वस्त झेलम जोशी,शिवसेना माजी नगरसेवक अशोक हरणावळ(माजी गटनेते),पदाधिकारी एकनाथ ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :लाडू वळणा-या महिलांशी संवाद साधताना आ.डॉ.नीलमताई गो-हे, पोपटलाल ओस्तवाल व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite