Peoples Media Pune header

Go Back

तिकोने उद्यानातील प्रथम “दिप संध्या”कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

21 Oct 2017

दिवाळी निमित्त कसबापेठेतील हिंदमाता प्रतिष्ठान आयोजित व विजय तिकोने संयोजित पहिल्या दिप-संध्याकार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तिकोने उद्यान येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी स्थायी समिती सदस्य योगेश समेळ,वृक्षसंवर्धन समिती सदस्या नगरसेविका सुजाताताई शेट्टी,पुणेजिल्हा नियोजन समिती सदस्य नगरसेविका पल्लवी जावळे,नगरसेवक विशाल धनवडे,स्थायी समिती माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांनी समयोचित मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात आकाशदीप संस्थेचे वाद्यवृंद्न व कलाकारांनी विविध सिनेगीते व अन्य गीतांची मैफिल सजवली.दीपोत्सव व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर कार्यक्रमाची संकल्पना विजय तिकोने व जितेंद्र परदेशी यांची होती.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब कर्वे,नूर सय्यद,किशोर आदमाने बंडू झिटे आदींनी विशेष परिश्रम केले.

छायाचित्र;मान्यवर व कलाकार यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite