Peoples Media Pune header

Go Back

“बालकांनी केलेल्या दुर्गांच्या प्रतिकृतीतून स्वराज्याचा इतिहास व श्री शिवप्रभूंची प्रेरणा समजते”आ.डॉ.नीलमताई गो-हे

21 Oct 2017

अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामान्य माणसे दिवाळी साजरी करीत आहेत.अशावेळी दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्याचे काम दिवाळी कार्यक्रमांनी साध्य होत आहे.तसेच बालकांनी केलेल्या दुर्गांच्या प्रतिकृतीतून स्वराज्याचा इतिहास निर्माते श्री शिवप्रभूंची प्रेरणा समजते व समाजात फार चांगल्या परंपरा तयार होत आहेत.शिवसेना वडगाव शेरीतील सैनिकांनी हे काम करून भगव्या ध्वजाशी बांधिलकी व्यक्त केली आहे.असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या व प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.शिवसेना वडगावशेरीच्या वतीने आयोजित किल्ले,व रांगोळी स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात त्त्या बोलत होत्या.लुम्बिनी बाग येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी गटनेते संजय भोसले.आयोजक यशवंत शिर्के(मा.विभागप्रमुख),योगिता शिर्के,शिव उद्योग शेनेचे सश्र अध्यक्ष आनंद गोयल,शाखाप्रमुख सुरेश मोरे,सचिन खांदवे,चेतन चव्हाण,सोनल खांदवे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,शिवसैनिक व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी निलेश पापळ,चंद्रकांत चव्हाण या कलाकारांनी गर्जा महाराष्ट्र माझाहे व अन्य गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली

छायाचित्र:बक्षीस वितरण करताना नीलमताई गो-हे,यशवंत शिर्के,आनंद गोयल व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite