Peoples Media Pune header

Go Back

दिग्गजांना एकत्रित आदरांजली उपक्रम

12 Nov 2017

शिवसेना पुणेशहर,संकल्प प्रतिष्ठान,व धायरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांतील दिग्गजांना एकत्रित आदरांजली वाहण्यात आली.स्थळ धायरी फाटा उड्डाण पुलाजवळ,यात१)सेनापती बापट(जयंती),२)केशवराव जेधे (स्मृतिदिन),३)एस.एम जोशी(जयंती),४)वसंतदादा पाटील(जन्मशताब्दी),५)मधु दंडवते (स्मृतीदिन),६)रमेश वांजळे(जयंती),७)डॉ.सलीम अली(जयंती) यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे आयोजन निलेश गिरमे व राम तोरकडी यांनी केले.या प्रसंगी रमेशबापू कोंडे,शिवाभाऊ पासलकर,रेखाताई कोंडे,स्मिता दातीर,अतुल चाकणकर,विवेक पाटील,प्रतिक देडगे,आदी मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बोलतांना रमेशबापू कोंडे यांनी या सर्व दिग्गजांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावली आहेच पण देश व समाज यांच्या प्रगतीत भरीव योगदान दिले आहे.आताच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती होणे आवश्यक आहे असे सांगितले.

छायाचित्र :दिग्गज व्यक्तिमत्वांना एकत्रित आदरांजली वाहताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite