Peoples Media Pune header

Go Back

भरत मित्रमंडळ,शिवा फौंडेशन व श्रावणबाळ फौंडेशनच्यावतीने ससूनला १५० गाद्या प्रदान

13 Nov 2017

भरत मित्रमंडळ,शिवा फौंडेशन,व श्रावणबाळ फौंडेशनच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयास १५० गाद्या प्रदान करण्यात आल्या.ससून रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भरत मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,शिवा फौंडेशनचे अध्यक्ष निरंजन दाभेकर,श्रावणबाळ फौंडेशनचे अध्यक्ष मयूर कडू,ससूनचे डिन डॉ.अजय चंदनवाले,मेडिकल सुपरिटेनडेन्ट अजय तावरे,डॉ.अभिजित जिने शिरीष मावळे,प्रमोद घाडगे,अनंतराव गांजवे पाटील,उमेश मिस्त्री,राजेंद्र पंडीत,महेश वाघ,अतुल बेहरे,गौरव पवार,परेश खांडके,धनंजय देशमुख प्रकाश भोईटे,सौरभ देशपांडे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना डिन.डॉ.अजय चंदनवाले यांनी ससून रुग्णालय हे सर्वसामान्यांना उत्तम प्रतीची वैद्यकीय सेवा प्रदान करीत आहे.मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याने साधन सामुग्रीची आवश्यकता असते,त्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत ही स्तुत्य बाब आहे असे सांगितले.

छायाचित्र:बाळासाहेब दाभेकर,अजय चंदनवाले व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite