Peoples Media Pune header

Go Back

“मा.बाळासाहेब ठाकरे हे जगद्विख्यात व्यंग्यचित्रकार होतेच,पण व्यंग्यचित्र हे त्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग ही होते”आ.डॉ.नीलमताई गो-हे

16 Nov 2017

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे जगद्विख्यात व्यंग्यचित्रकार तर होतेच मात्र व्यंग्यचित्र हे त्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग ही होते.अनेकदा हे बोलताना एक गोष्ट बोलायचे मात्र नंतर मिश्किलपणे प्रश्न विचारायचे,कला,राजकारण,सामाजिक असे विविध वेगवेगळे कप्पे त्यांच्या मनात नव्हते तर या सर्वांचा एक प्रवाह त्यांच्या व्यक्तीमत्वात असायचाअसे प्रतिपादन शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.कार्टूनिस्ट कम्बाईन या व्यंगचित्रकारांची संस्थेने बाळासाहेबांना आदरांजली म्हणून आयोजित व्यंग्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.हे प्रदर्शन १६ व १७ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन सारसबाग येथे भरविण्यात आले आहे.उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द.फडणीस,घनश्याम देशमुख,गणेश भालेराव,चारुहास पंडीत,विश्वास सूर्यवंशी,मुकीम तांबोळी व अन्य चित्रकार,गटनेते संजय भोसले,माजी गटनेते अशोक हरणावळ,राजेंद्र शिंदे,नगरसेवक विशाल धनवडे,नगरसेविका पल्लवी जावळे,नगरसेविका संगीताताई ठोसर,राजाभाऊ भिलारे,मनिष जगदाळे,शेलार गुरुजी,आदी मान्यवर उपस्थित होते.शि.द.फडणीस यांनी कार्टूनिस्ट कम्बाईन ही मा.बाळासाहेब ठाकरे यांनीच सुरु केलेली संस्था आहे.व्यंग्यचित्रकार हा जीवनातील विरोधाभासावर चित्र निर्मिती करतो असे सांगितले

छायाचित्र;उद्घाटनप्रसंगी नीलमताई गो-हे.शि.द.फडणीस,संजय भोसले व अन्य मान्यवर

 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite