Peoples Media Pune header

Go Back

स्व.प्रबोधनकार ठाकरे यांचा लेख वाचून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आदरांजली

20 Nov 2017

महाराष्ट्रातील समाजसुधारक व प्रखर विचारवंत स्व.प्रबोधनकार ठाकरे यांच्या ४४ व्या पुण्यस्मरण दिना निमित्त शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शिवसेना भवन पुणे येथे आदरांजली वाहण्यात आली.यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच प्रबोधनकारांनी लिहिलेल्या उठ मराठ्या उठया पुस्तकातील लेख वाचण्यात आले.या प्रसंगी शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चीम महाराष्ट्र चिटणीस किर्तीताई फाटक,राधिकाताई हरिश्चंद्रे,पद्मा सोरटे,गीता वर्मा,स्मिता रांजणे,नसीम शेख,ज्योती राजपूत,वंदना बोलाडे,मनीषा पड्याळ,अमृत पठारे,मकरंद पेठकर,स्मिता परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना किर्तीताई फाटक यांनी प्रबोधनकार म्हणजे ज्वलंत विचारांचे वादळ होते.त्यांच्या पुण्यस्मरण दिनी त्यांच्या विचारांचे स्मरण हीच खरी आदरांजली होय असे सांगितले.

छायाचित्र :प्रबोधकार ठाकरे यांच्या पुस्तकातील लेख वाचून आदरांजली वाहताना किर्तीताई पाठक,राधिकाताई हरिश्चंद्रे व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite