Peoples Media Pune header

Go Back

स्व.इंदिरा गांधी जयंतीला कॉम्प्यूटर कोर्स पूर्ण करणा-या महिलांना प्रमाणपत्र वाटप

20 Nov 2017

ह्युमॅनिटी हेल्पिंग हँड संस्थेच्या वतीने महिलांना कॉम्प्यूटर बेसिकचे मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.यात ४० विविध वयोगटातील महिलांनी प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षणार्थींना भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री स्व इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनाच्या दिवशी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.जुबेदा हाईटस भाग्योदय नगर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुमेल रजा,सेक्रेटरी मुर्तुझा शेख,आरिफ खान,संजय कांबळे,मिनाझ शेख,आतीया शेख,आदी मान्यवरांच्या बरोबरच महिलावर्ग उपस्थित होता.यावेळी बोलताना कुमेल रझा यांनी हे प्रशिक्षण सर्व जाती धर्माच्या व सर्व वयोगटाच्या महिलांसाठी मोफत असून त्याचा ज्यास्तीत ज्यास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.संजय कांबळे यांनी बोलताना संगणक प्रशिक्षण हे आधुनिक जगातील यशाची किल्ली असून महिला याद्वारे प्रगती करतील असे सांगितले.

छायाचित्र :प्रमाणपत्र वाटप करताना अध्यक्ष कुमेल रजा,सेक्रेटरी मुर्तुझा शेख,आरिफ खान,संजय कांबळे,मिनाझ शेख,आतीया शेख,आदी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite