Peoples Media Pune header

Go Back

“ग्रामीण भागात महिला व मुलींकरिता जागृती प्रकल्प राबविणार”आ.डॉ.नीलमताई गो-हे

03 Dec 2017

ग्रामीण भागातील महिला व मुलींना अधिकाधिक सुरक्षित वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे आहे.कोपर्डीच्या निकालाच्या निमित्ताने वाईट विचारांना आळा बसण्यास नक्कीच मदत होईल.या भागातील माध्यमिक शाळा-महाविद्यालयात स्री आधार केंद्र,अहमदनगर जिल्हा पोलीस यंत्रणा,पंचायत समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने एक जागृती प्रकल्प राबविण्यात येणार आहे,अशी घोषणा शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी कोपर्डी येथे केली. कोपर्डी प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर त्यांनी निर्भयाच्या घरी जाऊन तिच्या पालकांची भेट घेतली.कुलधरण, कोपर्डी,व कर्जत येथी शाळांना भेट देवून त्यांनी प्रत्येक शाळेस,ग्रंथालये,व्यायामशाळा,संगणक,आदी बाबींसाठी साडेतीन लाख रुपयांचा आमदार निधी जाहीर केला.या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी उत्स्फूर्त संवाद साधला.यावेळी त्यांनी या शाळांच्या शिक्षकांसाठी शोध मुलांच्या मनाचा-लेखन रेणू दांडेकर(संपादन पुरुषोत्तम भापकर,डॉ.मीनल नरवणे,डॉ.शशिकांत वायदंडे,टीन एजर्सच्या मनात-डॉ.श्रृती पानसे,तारुण्यगान-डॉ.अविनाश भोंडवे,टीन इज डॉट कॉम-डॉ.वैशाली देशमुख तर वद्यार्थ्यांसाठी हितगुज,वयात येणा-या मुलांसाठी हितगुज,वयात येणा-या मुलींसाठी हितगुज,वयात येणा-या मुलींसाठी :उमलत्या कळ्यांशी ही पुष्पा पालकर यांची पुस्तके देवू केली.

      तसेच डॉ.गो-हे यांनी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे व कर्जत पोलीस निरीक्षक श्री.भोळे यांच्याशी चर्चा करून महिला सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.यावेळी कर्जत ,कुळधरण,मिरजगाव व राशीन येथील शाळा –महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांकरिता जागृती प्रकल्प घेण्याचे निश्चित करण्यात आले.त्याचबरोबर दक्षिण नगर भागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महिला विषयक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संवेदनशीलतावाढविण्यासाठी एक कृतिसत्र घेण्यात येणार आहे.याकरता आवश्यक त्या सर्व विषयांचा पाठपुरावा येत्या अधिवेशनात करणार असल्याचे यांनी सांगितले  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite