Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब इंस्पिराचा इंसीररेटर प्रकल्प पूर्णत्वास

10 Dec 2017

महिलांचा रोटरी क्लब पुणे इंस्पिराने नुकताच त्यांचा सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल संबंधी प्रकल्प पूर्णत्वास नेला.जीजी १७४५२२३ क्रमांक असलेला हा रोटरी जागितक फंडातून अर्थ सहाय्य मिळालेल्या या प्रकल्पाद्वारे १६८ इन्सीररेटर्स शाळा,कॉलेज,मुलींची होस्टेल्स मध्ये बसविण्यात आले.महिलांना सॅनिटरी नॅपकीन वापरातून स्वच्छता व पर्यावरणाचे रक्षण या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.एमआयटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक शिकारपूर ,पाहुणे अरुण साठे(माजी अध्यक्ष),नेहा पिंगळे (माजी AWWA प्रमुख),दीपा गाडगीळ,भावी प्रांतपाल रवी धोत्रे,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय सहकारी क्लब कार्डिफचे सदस्य स्टीव्ह जेनकिन्स,पॉल बुप्लीन व अॅलिसन हे VHIDIO VIDव्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे कार्यक्रमात सहभागी होते.असाच प्रकल्प फिरोजपूर येथे निता पिंगळे यांनी राबविला होता.त्यांनी स्वच्छ भारत मिशनच्या टॉप टेन मध्ये पुण्याने यावे अशी अपेक्ष व्यक्त केली.दीपक शिकारपूर यांनी बोलताना हा प्रकल्प स्वच्छ भारत अभियानातील एक महत्वपूर्ण भाग आहे असे सांगितले.रवी धोत्रे यांनी हा प्रकल्प रोटरी प्रांतातील अन्य क्लबने सुद्धा राबवावा असे सांगितले व रोटरी इंस्पिराचे उत्कृष्ट्र कामगिरी बद्दल अभिनंदन केले.दीपा गाडगीळ यांनी बोलताना सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल संबंधी असलेल्या रेड डॉट पद्धती विषयी जनजगृती व्हावी असे प्रतिपादन केले.क्लबच्या अध्यक्ष सुनिता कटारिया यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे स्वतः लिहिलेली या प्रकल्पावरील कविता सादर केली.माजी अध्यक्ष व या प्रकल्पाच्या प्रमुख पिनल वानखडे यांनी आभार प्रदर्शन केले,व आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत सुरु झालेला हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्णत्वास गेल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite