Peoples Media Pune header

Go Back

रोटरी मेट्रोच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “तारुण्यभान”ही तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न.- राणी बंग यांचे मार्गदर्शन

11 Dec 2017

रोटरी क्लब ऑफ पुणेच्या माध्यमातून प्रसिध्द स्रीरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.राणी बंग व त्यांच्या सहका-यांनी “तारुण्यभान”ही ३ दिवसांची कार्यशाळा माईर्स कोथरूडच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाली.१७ ते २० वयोगटातील सुमारे ८०० मुला मुलीनी याचा लाभ घेतला.वाढत्या वयातील शारीरिक व मानसिक बदल,जबाबदार लैंगिक वर्तन,प्रेम,योग्य जोडीदाराची निवड,सुखी वैवाहिक जीवन,गर्भनिरोधक साधने,प्रौढ वयातील शारीरिक व मानसिक समस्या इत्यादी विविध विषयांचा समावेश या कार्यशाळेत होता.दृक्श्राव्य माध्यमे,विविध खेळ,गाणी,परस्पर संवाद यांचा यात वापर करण्यात आला.कार्यशाळेचे उद्घाटन ७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता झाले.प्रमुख पाहुणे नगरसेवक जयंत भावे होते रोटरी मेट्रोचे अध्यक्ष रो.माधव तिळगुळकर,सचिव रो.भावना चाहुरे,निमंत्रक अनघा गोखले,प्राचार्या प्रो.रोहिणी काळे,आदी मान्यवर उपस्थित होते.माधव तिळगुळकर व जयंत भावे यांनी या विषयावर आपली मते मांडली.विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्साहाने सहभाग घेतला.दिनांक ९ रोजी झालेल्या समारोपा पूर्वी प्रश्नोत्तर तास चांगलाच रंगला.अध्यक्षस्थानी ध्यास फौंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई होत्या.प्रा.रोहिणी काळे,प्रो.मृणाल फटांगरे,मेट्रोच्या सचिव रो.भावना चाहुरे,सहसचिव पद्मा शहाणे.उपस्थित होते.सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.रोटरी मेट्रो व माईर्स तर्फे डॉ.राणी बंग यांचा सत्कार करण्यात आला.रोटरी मेट्रोच्या वतीने गेली १३ वर्ष हा कार्यक्रम पुणे शहर व परिसरात व विविध ग्रामीण भागात राबवीत आहे.या कार्यक्रमाचा लाभ आतापर्यंत सुमारे १०००० पेक्षा ज्यास्त विद्यार्थ्यांनी घेतला आहे.हा कार्यक्रम अतिचय लोकप्रिय आहे.व त्यासाठी सातत्याने मागणी असते.त्यामुळे आगामी काळात ही हा कार्यक्रम सुरु ठेवण्याचा रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचा मानस आहे.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite