Peoples Media Pune header

Go Back

देवी शाकंभरी पोर्णिमे निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर येथे आ.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते आरती

01 Jan 2018

आज देवी शाकंभरी पोर्णिमा.या निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर येथे ५१ प्रकारच्या विविध शाक भाज्यांची आरास करण्यात आली.ही आरास भव्य अशा इक्षुदंडू महालात(संपूर्ण ऊस वापरून) करण्यात आली.याची मध्यान्ह आरती शिवसेना प्रवक्ता व प्रतोद  आ.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते करण्यात आली.या प्रसंगी सत्यजित गो-हे-परळीकर,लातीकाताई गो-हे,झेलम जोशी,माजी गटनेते अशोक हरणावळ,राजेंद्र शिंदे(मा.उपशहर प्रमुख),मंदिराचे कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम,उत्सव प्रमुख शिरीष मोहिते,आदी मान्यवर उपस्थित होते.उत्सवा नंतर या भाज्या अनाथ मुलांच्या संस्थेस प्रदान करण्यात येणार आहेत.या प्रसंगी महाराष्ट्रात अन्नधान्य,शाक-भाजीपाला उत्तम प्रमाणात पिकावा,शेतकरी व नागरिक सुखी व्हावेत अशी प्रार्थना केल्याचे आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी नमूद केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite