Peoples Media Pune header

Go Back

सदानंद शेट्टी यांच्या हस्ते प्रभागातील पाणी पुरवठा पाईप लाईनचे उद्घाटन

05 Jan 2018

कसबा पेठ प्रभाग १६ क मधील काही भागात पाणी समस्या जाणवत होती.यासाठी नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांच्या विकासनिधीतून सुमारे १६ लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा पाईपच्या कामाचे उद्घाटन सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष)यांच्या हस्ते करण्यात आले.यात इंदिरा नगर,श्रमिकनगर,६९-४१४ मंगळवार पेठ,नवभारत तरूण मंडळ ते प्रियदर्शनी महिला मंडळपर्यंत,लोकसेवा मंडळ,समता मित्रमंडळ,२१६ मंगळवार पेठ ते शिवराया तरूण मंडळ,२२६ मंगळवार पेठ ते सोमनाथ कांबळे पथ (शिवाजी स्टेडियम),अशा कामांचा समावेश होता.या प्रसंगी सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी,विजय चंडालिया,शाम पवार,अबरारभाई शेख,जावेद शेख,मंगेश साखरे,मुन्नाशेठ परदेशी,इक्बाल शेख,छगनलाल चव्हाण,महेंद्र लालबिघे,कमलबाई चव्हाण,कमलबाई हस्ते,राकेश जगवाणी,बबलू सय्यद,सुलतान शेख आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी पाणी प्रश्न बराच मोठा आहे.जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसे काम हाती घेण्यात येईल असे सांगितले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite