Peoples Media Pune header

Go Back

द वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असो च्या नवीन ऑफिसचे महेश आखाडे यांच्या हस्ते उद्घाटन

06 Jan 2018

पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या नव्या ऑफिसचे उद्घाटन अॅडीशनल कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स महेश आखाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यादव व्यापार भवन शुक्रवार पेठ येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नरेंद्र सोनवणे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन.प्रशांत नांदेकर जॉईंट कमिशनर महाराष्ट्र राज्य जीएसटी.नवनीतलाल बोरा(सचिव पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन),अतुल कुलकर्णी,व्ही.जी शहा,शरद सूर्यवंशी,आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात असोसिएशनच्या वतीने चालविल्या जाणा-या सर्टिफिकेट कोर्स इन टॅक्सेशन जीएसटी स्पेशल पूर्ण करणा-या २२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.या प्रसंगी बोलताना नरेंद्र सोनवणे यांनी असोसिएशन हे प्रशासन व व्यापारी उद्योजक यात दुवा म्हणून कार्य करीत आहे व या क्षेत्रात मागणी वाढत असून त्याला अनुसरून असोसिएशन सुद्धा कार्यविस्तार करीत आहे असे सांगितले.या प्रसंगी महेश आखाडे यांनी टॅक्स क्षेत्रातील तसेच याविषयतंत्रज्ञाना विषयी सर्वांनी अद्ययावत रहावे असे आवाहन केले.

छायाचित्र :नवीन ऑफिस उद्घाटन प्रसंगी महेश आखाडे,नरेंद्र सोनवणे व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite