Peoples Media Pune header

Go Back

जैन वधु-वर परिचय संस्थेचा ३१ व मेळावा संपन्न

07 Jan 2018

जैन वधुवर परीच्या संस्थेचा ३१ वा मेळावा महालक्ष्मी लॉन येथे संपन्न झाला.यात सुमारे २५० इच्छुक वधू-वर व त्यांचे पालक सहभागी होते.या वेळी १००० इच्छुक वधुवर परिचय असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.हे सर्व निशुल्क होते.या प्रसंगी विजयभाई शहा(संस्था अध्यक्ष),विशेष पाहुण्या ज्योतीबेन शहा(समाजसेविका),प्रमुख पाहुणे राजेशभाई शहा,रोहित झवेरी(सेक्रेटरी),योगेशभाई शहा,अमोल झवेरी,लताबेन शहा(उपाध्यक्ष)आदी मान्यवर उपस्थित होते.प्रस्ताविक अमोल झवेरी यांनी केले.यावेळी मार्गदर्शन करताना ज्योतीबेन शहा यांनी वधूवरांनी जैन समाजात असलेली एकत्रकुटुंब पद्धती टिकवावी,यासाठी काही थोड्याफार अडचणी असतील,मात्र एकंदरीत विचार करता एकत्र कुटुंब पद्धती फायद्याची आहे असे सांगितले.अशोकभाई शहा यांनी पती पत्नी विवाहाने फक्त एक जोडीदार मिळतो असे नाही तर बेस्ट फ्रेंड मिळतो असे सांगितले.कार्यकारिणी सदस्य राजीवभाई शहा यांनी बोलताना अल्पसंख्य असणा-या जैन समाजातील वधुवरांना ही संस्था व्यासपीठ ठरत असून या माध्यमाने आजवर हजारो विवाह जुळले आहेत असे सांगितले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गुजर यांनी केले.आभारप्रदर्शन रोहित झवेरी यांनी केले.

छायाचित्र :वधुवर मोफत पुस्तिकेचे प्रकाशन करताना डावीकडून रोहित झवेरी,लताबेन शहा,ज्योतीबेन शहा,राजेशभाई शहा,विजयभाई शहा,योगेशभाई शहा,अमोल झवेरी, 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite