Peoples Media Pune header

Go Back

स्व.चंद्रकांतजी छाजेड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अपंग शाळेस धान्य व मुलांना खाऊ वाटप

13 Jan 2018

माजी राज्यमंत्री चंद्रकांतजी छाजेड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भ्रष्ट्राचार निर्मुलन समिती व महावीर फूड बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने,येरवडा येथील शासकीय बहुद्देशीय अपंग संमिश्र केंद्र या शाळेस धान्य व तेथील ५० मुलांना खाऊ,तिळगुळ,वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी विजयकुमार मर्लेचा,शांतीलाल देसरडा,अभय छाजेड,मधुसूदन घाणेकर,स्व चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव राहुल छाजेड,शाळेच्या सुपरिटेंडेन्ट डॉ.सुचिता सोनवणे,संजीवनी वाघ(विशेष शिक्षिका),यल्लू कादरी,मारुती पवार,मंगेश पवार,चंद्रकांत लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.मधुसूदन घाणेकर यांनी मुलांचे विनोद व गोष्टी सांगून मनोरंजन केले.विजयकुमार मर्लेचा यांनी आगामी काळात शाळेसाठी काही आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

छायाचित्र :मान्यवर व विद्यार्थी समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite