Peoples Media Pune header

Go Back

जनता वसाहत एसआरएतील गैरकारभाराबाबत राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन

14 Jan 2018

जनता वसाहत मधील झोपडपट्टी पुनर्वसन(एसआरए) कामामध्ये होत असलेल्या गैरकारभाराबद्दल गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.शिवसेना पर्वती मतदारसंघाचे नवनियुक्त विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई येथे मंत्रालयात ही भेट घेतली.घरांची संख्या ज्यास्त असताना कमी दाखवणे,स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेणे,एसआरए व विकासक मनमानीपणे कारभार करीत आहेत असे मुद्दे यात आहेत.याप्रसंगी मुकेश पोटे,समीर पवार,अमोल साळुंखे,आदी उपस्थित होते या वेळी वायकर यांनी याप्रकरणी आहवाल मागवून तत्काळ चौकशीचे आदेश दिले असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

सोबत निवेदन जोडले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite