Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब विजडमच्या वतीने डॉ.अदित्य अभ्यंकर यांना व्यावसाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान

14 Jan 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे विजडमच्या वतीने देण्यात येणारा व्यावसाईक गुणवत्ता पुरस्कार(व्होकेशनल एक्सलन्स अवोर्ड) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता(डीन)डॉ.अदित्य अभ्यंकर यांना एअर मार्शल भूषण गोखले(रिटा)यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल.श्रीफळ,मानपत्र,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.प्रभूज्ञान मंदिर नवीपेठ येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रवी धोत्रे,रोटरी क्लब विजडमचे अध्यक्ष रो.रोहित फडणीस,सेक्रे.दिप्ती नाईक,रो.रवींद्र धर्माधिकारी,रो.अर्चना वैद्य,रो.रजनी स्वामी,आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व रोटेरीयन उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना भूषण गोखले यांनी देश बदलत आहे.तंत्रज्ञान विकसित होत आहे.अशा वेळी विविध व्यावसाईक कौशल्य असणा-या समर्पित मनुष्यबळाची आवश्यकता आहे असे सांगितले.रवी धोत्रे यांनी समाज हा कृतघ्न नसतो तर कृतज्ञ असतो योग्य वेळी योग्य व्यक्तींना सन्मानित करतो असे सांगितले सत्काराला उत्तर देताना आदित्य अभ्यंकर यांनी पुरस्काराने अधिक जोमाने कामाची प्रेरणा मिळाला असल्याचे सांगितले.   

छायाचित्र  :डावीकडून दिप्ती नाईक,रोहित फडणीस,सौ.अभ्यंकर,आदित्य अभ्यंकर,भूषण गोखले,रवी धोत्रे  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite