Peoples Media Pune header

Go Back

लिंगायत समाज स्मशानभूमीतील विकासकामांचे योगेश गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन

19 Jan 2018

लिंगायत समाजच्या वडगाव बुद्रुक येथील स्मशानभूमीमधील विकासकामांचे भूमिपूजन भारतीय जनता पक्ष शहर प्रमुख योगेश गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांच्या विकास निधीतून ही सुमारे १० लाख रुपये खर्चाची कामे होणार आहेत.या प्रसंगी नगरसेवक अॅड.प्रसन्नदादा जगताप,नगरसेवक श्रीकांत जगताप,नगरसेवक मंजुषा नागपुरे,नगरसेवक ज्योती गोसावी,प्रशांत हिंगमिरे,शिवशंकर भुईभार,शशिकांत अनवणे,सोमनाथ गाढवे,प्रतिक देसरडा,शेखर वाघ,राजश्री कसबेकर,प्रकाश कंकाळे,रामेश्वर चिकले,राजू जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी योगेश गोगावले यांनी शहरातील सर्व सुविधा व अस्थापना जशा महत्वाच्या असतात तसेच स्मशानभूमीसुद्धा महत्वाची असते,तेथील सुविधांची प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रसन्नदादा जगताप यांनी आगामी काळात याठिकाणी अजून अन्य विकास कामे केली जातील असे आश्वासन दिले.  

छायाचित्र :उद्घाटनप्रसंगी योगेश गोगावले,प्रसन्नदादा जगताप व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite