Peoples Media Pune header

Go Back

मा.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण आयोजन

21 Jan 2018

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रभाग १५ च्या वतीने महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.साकेत हॉल  हॉल शिवतीर्थनगर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शहरप्रमुख मा.आ.चंद्रकांत मोकाटे,सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे,आयोजक सविताताई मते(महिला आघाडी शहर प्रमुख),अनिल घोलप,सत्यजित जोगळेकर(विश्वकल्याण गुरुकुल संस्था),अजय कुलकर्णी(युवा रोटरी),स्मिता दातीर,श्रीपाद चिकणे,पल्लवी नागपुरे,सुनिता येनपुरे,नितीन पवार,गजानन थरकुडे,राधिकाताई हरिचंद्रे,छायाताई भोसले,पद्माताई सोरटे,कस्तुरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना चंद्रकांत मोकाटे यांनी आयटी क्षेत्रात महिला कामगारांची वाहतूक धोकादायक होत आहे तसेच शाळांमधील लहान मुले मुलींचा ही सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे.महिला ड्रायव्हर तयार झाल्यास हा प्रश्न सुटेल असे सांगितले.सविताताई मते यांनी बोलताना या वर्गात २५ महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल व त्यांना या क्षेत्रात स्थिर होण्यासाठी आवश्यक टी मदत केली जाईल असे सांगितले.  

छायाचित्र ;मार्गदर्शन करताना सविताताई मते व अन्य मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite