Peoples Media Pune header

Go Back

मा.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त चित्रकला स्पर्धा.

21 Jan 2018

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रभाग १५ येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.भरत मित्रमंडळ,बस कंपनी ग्रुप,शिवा फौंडेशन,व श्रावणबाळ फौंडेशनच्या सहकार्याने ही स्पर्धा वर्तकबाग येथे भरविण्यात आली.यात सुमारे २५०० विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले.या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मा.आ.महादेव बाबर,नगरसेवक विशाल धनवडे,राहुल पारखे,मयूर कडू,निरंजन दाभेकर,गजानन पंडीत,सविता मते,स्वातीताई कथलकर,अनिल येनपुरे,प्रभा सावंत,विजयाताई जेधे,संतोष भूतकर,संदीप गायकवाड,वृषाली दुबे,चंदन साळुंखे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक-पालक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना महादेव बाबर यांनी स्पर्धेत कोन कोन जिंकले यापेक्षा कोणी भाग घेतला हे महत्वाचे.मुलांच्या कलागुणांना पालकांनी प्रोत्साहन द्यावे फक्त परीक्षेतील मार्क बघू नये असे सांगितले.राहुल पारखे यांनी बोलताना गेली १२ वर्ष ही स्पर्धा आयोजित करीत असल्याची माहिती दिली.संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.या वेळी जादूच्या खेळणे मुलांचे मनोरंजन करण्यात आले.

छायाचित्र :विजेते विद्यार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite