Peoples Media Pune header

Go Back

एच.आय.व्ही.संसर्गित विवाहेच्छुक व्यक्तींसाठी वधू-वर सूचक मेळावा

01 Feb 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो,रोटरी क्लब ऑफ पुणे धायरी,रोटरी क्लब ओ पुणे हिलसाईड,मानव्य संस्था,अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था आणि विहान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही संसर्गित विवाहेच्छुक व्यक्तींसाठी वधु-वर पालक परिचय मेळावा शनिवार  दिनांक १० फेब्रुवारी २०१८ रोजी निवारा सभागृह,नवी पेठ,पुणे येथे सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.मधुमेह,रक्तदाब,हृदयरोग या सारख्या विविध आजारांसारखाच हा एक आजार असून नियमित सकस पौष्टिक आहार,व्यायाम व औषधोपचार घेतल्याने या आजाराचेही नियंत्रण ठेवणे शक्य असते.समाजातील या दुर्लक्षित व विशेष करून चारित्र्यावर ठपका ठेवल्यामुळे वंचित रहाणा-या नागरिकांसाठी त्यांचेही वैवाहिक आयुष्य योग्य अशा समदु:खी जोडीदाराबरोबर व्यतीत करता यावे म्हणून त्यांचा विवाहयोग जमून यावा म्हणून गेल्या ९ वर्षांपासून हा मेळावा नियमितपणे आयोजित केला जातो.मेळाव्यातून अशा बाधित नागरिकांचे शेकडो विवाह आजवर यशस्वीपणे जमून आले.तज्ञ व्यक्तींकडून समुपदेशनही उपलब्ध करून दिले जाते.या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी या क्षेत्रात काम करणा-या विविध सेवाभावी संस्था,शासकीय निमशासकीय रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र,या रुग्णांना औषधोपचार-समुपदेशन करणा-या सेवाभावी संस्था व माध्यमे यांनी अशा विवाहेच्छुक व्यक्तींपर्यंत ही माहिती पोचविण्याचे पुण्यकर्म करावे असे नम्र आवाहन आहे.

   या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणा-या वधु-वरांनी पूर्वनोंदणी व अधिक माहितीसाठी.अक्षदा विवाह पुनर्विवाहसंस्था संपर्क नंबर 8237093455 :मानव्य संस्था -9168842688 किंवा विहान 020 26336083 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

डॉ.राजेंद्र भवाळकर अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था rvbo7@ymail.com,शिरीष लवाटे मानव्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite