Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब मेट्रोच्या वतीने ११० लाभार्थींना जयपूर फुट व पोलिओ कॅलीपर्सचे वाटप

03 Feb 2018

रोटरी क्लब ऑफ मेट्रो,भारत विकास परिषद,व मायमर मेडिकल कॉलेज,मानाजी राजुजी हिंदु सॅनिटोरीयम यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव येथे ११० लाभार्थी नागरीक,महिला,लहान मुले,मुलींना मोफत जयपूर फुट व पोलिओ कॅलीपर्सचे वाटप करण्यात आले.तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेज येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी मेट्रोचे अध्यक्ष माधव तिळगुळकर,सेक्रेटरी भावना चाहुरे,कन्व्हेनर किरण कुंभार,माधवी चौहान,डॉ सुनिता नगरे(विश्वस्त माईर्स एमआयटी)सचिन गांजवे(भारत विकास परिषद),दीपक भडकमकर (भारत विकास परिषद),आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना माधव तिळगुळकर यांनी कोणतीही शारीरिक कमतरता यशात बाधा बनू शकत नाही.आधुनिक तंत्रज्ञान व आत्मविश्वास याने कमतरतेवर मात करता येते असे सांगितले.कार्यक्रमात रेल्वे अपघातात पाय गमावलेले व जयपूर फुट वापरत असलेले तरूण विजय खोपकर यांनी कडकलक्ष्मी सादर केली यावेळी त्यांच्या नृत्याने व पदलालीत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली

छायाचित्र :नागरिकांना जयपूर फुट वाटप करताना मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite