Peoples Media Pune header

Go Back

“फोटोग्राफी ही देखील अभिजात कलाच”-रवी परांजपे

03 Feb 2018

पूर्वीच्या काळात चित्रकाराने समोर बसवून काढलेले चित्र म्हणजे अभिजात व फोटोग्राफी म्हणजे दुय्यम समजले जात होते.मात्र बदलते तंत्रज्ञान,वाढलेला आवाका व लोकांची पसंती यामुळे फोटोग्राफी ही कला दुय्यम न रहाता ती एक अभिजात कला झालेली आहेअसे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी केले.रोटरी क्लब साउथच्या वतीने बालगंधर्व रंगमंदीर कलादालन येथे आयोजित हौशी रोटेरियन व संबंधीत फोटोग्राफर्स यांनी काढलेल्या फोटो फेस्टया दोन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी रोटरी साउथचे अध्यक्ष रो.डॉ.किरण पुरोहित.रो.संजीव ओगले(सर्व्हिस प्रोजेक्ट्स),नंदिनी जोग(आर्ट & कल्चरल कमिटी चेअरमन)किरण वेलणकर आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व नागरिक उपस्थित होते.या प्रदर्शनात सुमारे ७५० फोटो आहेत.विषय निसर्ग व प्राणी जीवन.दिनांक ३ व ४ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वेळेत ते सर्वाना मोफत आहे.नवोदित लोकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून दिनांक ३ फेब्रुवारी रोजी ५ ते ६ या वेळेत मिलिंद हळबे व दिनांक ४ फेब्रुवारी रोजी ५ ते ६ या वेळेत सतीश पकणीकर हे मार्गदर्शन करतील.तसेच ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता एकूण १८ बक्षिसे दिली जातील असे किरण पुरोहित यांनी नमूद केले.

छायाचित्र :प्रदर्शन पाहताना रवी परांजपे,किरण पुरोहित व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite