Peoples Media Pune header

Go Back

बिझनेस गुरु डॉ.विवेक बिंद्रा यांचे व्यवसायिकांना मार्गदर्शन व्याख्यान ८ फेब्रुवारी रोजी पुण्यात

06 Feb 2018

आशिया खंडातील सर्वात सुप्रसिद्ध बिझनेस गुरु डॉ.विवेक बिंद्रा यांचे व्यावसायिकांना मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन ऑप्टीमाईझ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आले आहे.हे व्याख्यान गणेश कला क्रीडा केंद्र,पुणे येथे गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत संपन्न होईल.यात ते व्यावसायिकांना व्यवसायात अपयश,व्यवसायाची अपेक्षित वाढ न होणे,व्यवसायाचे भविष्यकालीन नियोजन,ताणतणाव मुक्ती आदी व अन्य विषयांवर प्रेरक व मार्गदर्शक व्याख्यान देतील.अशी महिती ऑप्टीमाईझ इंडियाचे सीईओ व को फाऊंडर धीरज चित्तोडिया,व मार्केटिंग प्रमुख शालिनी लवास यांनी पत्रकार परिषदेत दिली.तसेच डॉ.विवेक बिंद्रा यांचे यु ट्यूब चे २० लाख सबस्क्रायबर आहेत व ९ ते १० करोड लोकांनी त्यांचे व्हिडीओ पहिले असल्याचे नमूद केले.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite