Peoples Media Pune header

Go Back

ब्रिटीशकालीन माणिकनाला स्लॅब कामाचे सदानंद शेट्टी व सुजाताताईशेट्टी यांच्या हस्ते

09 Feb 2018

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या माणिकनाल्यावर ब्रिटीशकालीन स्लॅब आहे याला जवळजवळ १०० वर्ष पूर्ण झाली असून त्याची मुदत संपलेली आहे.तसेच हा स्लॅब एसव्ही युनियन शाळा,शाहू उद्यान,नरपतगीर चौक,व लडकत पेट्रोलपंप अशा चार ठिकाणी यापूर्वीच तुटला आहे.मुदतबाह्य झालेला हा धोकादायक स्लॅब कोसळून कोणाची जीवित-वित्त हानी होऊ नये यासाठी सुजाताताई शेट्टी यांच्या विकास निधीतून २० लाख रुपये खर्चून येथे नवीन स्लॅब टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष व सुजाताताई शेट्टी(नगरसेविका) यांच्या हस्ते सदानंद नगर येथे करण्यात आले.या प्रसंगी रियाज शेख,मंगेश साखरे,मयूर चव्हाण,किरण साखरे,पांडुरंग शिंदे,मुमताज शेख,सकुबाई कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :सदानंद शेट्टी व सुजाताताई शेट्टी व नागरिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite