Peoples Media Pune header

Go Back

अल्पकाळासाठी महागडे ड्रेस विकत घेण्याऐवजी भाड्याने मिळण्याची नवी संकल्पना “राईड द न्यू वेव्ह”

09 Feb 2018

लग्नाला अथवा पार्टीला किवा एखाद्या विशेष दिवसासाठी कित्याकदा महागडे-किमती ड्रेस घेतले जातात.साड्या ही घेतल्या जातात मात्र ते नंतर विशेष वापरले जात नाही व अनावश्यक पणे पैसे अडकून राहतात.यासाठी विविध कारणांसाठी लागणारे उंची ड्रेस,साड्या व ज्वेलरी भाड्याने मिळण्याची संकल्पना मनात ठेवून मृदुल निवसरकर यांनी राईड द न्यू वेव्हहे अशी वस्रप्रावरणे व दागिने भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.करिस्मा सोसायटी कोथरूड समोर असलेल्या लोटस प्लाझा येथे तिस-या मजल्यावर हे बुटिक सुरु केले आहे.येथे लग्नाला.पार्टीला,व्हालेंटाइन,तसेच प्री वेडिंग फोटोग्राफीसाठी,नवरात्री,व विविध शोसाठी आवश्यक शेरवानी,ब्लेझर,नबाबी,नऊवारी,लेहंगा,गाऊन्स,घागरा चोली,असे सर्व आवश्यक दागिन्यासह मिळतात.तसेच एकदा वापरलेले कपडे दुस-या ग्राहकाला देण्यापूर्वी ते ड्रायक्लीन व प्रेस केले जातात.हा उद्योग सुरु करणा-या उद्योजिका मृदुल निवसरकर म्हणतात आजच्या काळात फॅशन व गरजा बदलत रहातात.यामुळे सर्व वयोगटाचे स्री पुरुष यांची यासाठीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.अधिक माहितीसाठी mrudul.n@gmail.com

छायाचित्र :महिला ग्राहकाला दागिने चढवताना मृदुल निवसरकर उजवीकडे 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite