Peoples Media Pune header

Go Back

भरत मित्रमंडळ महाशिवरात्र उत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न

10 Feb 2018

भरत मित्र मंडळ महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने आयोजित ३ दिवसीय उत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.रमणबाग शाळा मैदान येथे झालेल्या या उद्घाटन प्रसंगी मन्दलचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,निलेश वावरे,अंकुश काकडे,मयूर कडू,महेश वाघ,राजेंद्र पंडीत,विवेक खटावकर,संदीप पाटील,शिरीष मावळे,प्रमोद घाडगे,बाबासाहेब जाधव,विजय पाटील,अनिल येनपुरे,मल्हारी जागडे,ऋषिकेश बालगुडे,सचिन शितोळे,उमेश गालिंदे,राहुल पारखे,आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी सुप्रसिद्ध कलाकार अमर ओक यांनी आपल्या बासरी वादनाने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.त्यांनी प्रथम तुला वंदितोया गणेश स्तवनाने सुरुवात केली.या नंतर गगन सदन तेजोमय,काय बाई सांगू, श्रावणात घन निळा,ही व अन्य जुनी नवी गीते बहारदार पणे नटराज असलेल्या महादेव चरणी सादर केली.  

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी गिरीश बापट,बाळासाहेब दाभेकर,गिरीश ओक व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite