Peoples Media Pune header

Go Back

एचआयव्ही संसर्गीत वधुवर सूचक मेळाव्यात जमल्या ९ लग्नगाठी

10 Feb 2018

रोटरी क्लब मेट्रो,रोटरी क्लब धायरी,मानव्य,अक्षदा विवाह संस्था,व विहान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एचआयव्ही संसर्गीत वधुवर सूचक मेळाव्यात ९ जणांचे लग्न जमून आले.हा मेळावा निवारा वृद्धाश्रमात संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख पाहुण्या आ.मेघाताई कुलकर्णी होत्या त्यांनी या सर्व लग्नांत आपल्यातर्फे माहेरची भेट म्हणून रुखवत देणार असल्याचे जाहीर केले.या प्रसंगी रो राजेंद्र भवाळकर(अक्षदा विवाह संस्था),रो.माधव तिळगुळकर(अध्यक्ष रोटरी क्लब मेट्रो),रो.शारदा चव्हाण(अध्यक्ष रोटरी क्लब हिलसाईड),शिरीष लवाटे(मानव्य संस्था),जयंत भावे(नगरसेवक),आदी मान्यवरांच्या बरोबरच गुजरात,लातूर,परभणी,सोलापूर,कोल्हापूर,नागपूर व अन्य ठिकाणाहून आलेले वधुवर व पालक असे १९० जन उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मेघाताई कुलकर्णी यांनी हा आजार लपवून ठेवू नये,जोडीदारा पासून सुद्धा नाही,समाजाचा अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे असे सांगितले,कित्येकदा अशा व्यक्तींच्या लग्नात घरातले सुद्धा येत नाहीत,म्हणून येथे जमलेल्या सर्व विवाहात माहेरचे म्हणून रुखवत आपण देणार आहोत असे सांगितले.

छायाचित्र :डावीकडून शिरीष लवाटे,राजेंद्र भवाळकर,शारदा चव्हाण,मेघाताई कुलकर्णी,जयंत भावे,माधव तिळगुळकर. टिप:आपल्या सुविधेसाठी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite