Peoples Media Pune header

Go Back

महाशिवरात्री उत्सवात रंगली राहुल देशपांडे व स्वप्नील बांदोडकर यांची जुगलबंदी

11 Feb 2018

समस्त कलाचा अधिपती असलेल्या भगवान शंकर महादेवाचा शिवरात्री महोत्सव संपूर्ण भारतात साजरा होतो.भरत मित्रमंडळ आयोजित महाशिवरात्र महोत्सवाच्या दुस-या दिवशी सुप्रसिद्ध शास्रीय गायक राहुल देशपांडे व सुगम संगीतातील दिग्गज स्वप्नील बांदोडकर यांची शास्रीय व सुगम संगीताची जुगलबंदी रंगली.रमणबाग शाळेच्या मैदानात संध्याकाळी संपन्न झालेल्या या संगीत मैफिलीची सुरुवात पुरिया धनश्री रागातील मोरी पायलिया झणकारने सुरुवात झाली.यानंतर विविध रागांतील व अन्य गीते मला वेड लागले प्रेमाचे,अलबेला सजन आयोसादर करून कानसेन नागरिकांची दाद मिळविली.या प्रसंगी भरत मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,मयूर कडू,मा.आ.मोहनदादा जोशी,नगरसेवक विशाल धनवडे,गजानन पंडीत,राहुल पारखी,अनिल येनपुरे,राजेंद्र पंडित आदी मान्यवर व मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

छायाचित्र: अलबेला सजन आयो रेगीत सादर करताना स्वप्नील बांदोडकर व राहुल देशपांडे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite