समस्त कलाचा अधिपती असलेल्या भगवान शंकर महादेवाचा शिवरात्री महोत्सव संपूर्ण भारतात साजरा होतो.भरत मित्रमंडळ आयोजित महाशिवरात्र महोत्सवाच्या दुस-या दिवशी सुप्रसिद्ध शास्रीय गायक राहुल देशपांडे व सुगम संगीतातील दिग्गज स्वप्नील बांदोडकर यांची शास्रीय व सुगम संगीताची जुगलबंदी रंगली.रमणबाग शाळेच्या मैदानात संध्याकाळी संपन्न झालेल्या या संगीत मैफिलीची सुरुवात पुरिया धनश्री रागातील “मोरी पायलिया झणकार”ने सुरुवात झाली.यानंतर विविध रागांतील व अन्य गीते “मला वेड लागले प्रेमाचे”,अलबेला सजन आयो”सादर करून कानसेन नागरिकांची दाद मिळविली.या प्रसंगी भरत मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,मयूर कडू,मा.आ.मोहनदादा जोशी,नगरसेवक विशाल धनवडे,गजानन पंडीत,राहुल पारखी,अनिल येनपुरे,राजेंद्र पंडित आदी मान्यवर व मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र: “अलबेला सजन आयो रे”गीत सादर करताना स्वप्नील बांदोडकर व राहुल देशपांडे.
© 2011. Peoples Media Pune