Peoples Media Pune header

Go Back

मानव्यच्या संस्थापिका स्व.विजयाताई लवाटे यांच्या १३ व्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली

12 Feb 2018

भूगाव येथील मानव्य (एचआयव्ही बधीत मुलामुलींसाठीची संस्था)संस्थेच्या संस्थापिका स्व.विजयाताई लवाटे यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना एस.एम.जोशी सभागृह येथे आदरांजली वाहण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष व विजयाताईचे पुत्र शिरीष लवाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व दिप प्रज्वलन केले.या प्रसंगी संस्थेतील मुले मुली.समीर ढवळे(ट्रस्टी)सूरसखी गानवृंदाच्या मानिनी गुर्जर व विविध सामजिक व व्यावसायिक क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना शिरीष लवाटे यांनी विजयाताईंनी सामजिक कार्य करीत असताना कुटुंबियांत ही त्या कार्याविषयी आस्था निर्माण केली.कित्येकदा सामाजिक कार्यकर्त्यांचे कार्य हे कुटुंबियांना फारसे आवडतेच असे नाही.विजयाताईनी केलेले परिश्रम त्यांच्या संस्थेचा वारसा पुढे चालवताना होत आहे असे सांगितले.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या विध्यार्थ्यानी गाईलेल्या प्रार्थना गीताने झाली.यानंतर मानिनी गुजर व त्यांच्या महिला साथीदारांनी कजरा मोहब्बतवालाया कार्यक्रमात जुन्या नव्या चित्रपटातील गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले.

छायाचित्र :स्व.विजयाताई लवाटे यांना आदरांजली वाहताना शिरीष लवाटे व समीर ढवळे  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite