Peoples Media Pune header

Go Back

‘अॅट्रॉसिटी’ २३ फेब्रुवारीलाचित्रपटगृहात  

13 Feb 2018
‘अॅट्रॉसिटी’ २३ फेब्रुवारीलाचित्रपटगृहात   चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांच प्रतिबिंब हे सिनेमात दिसतं असतं. ‘अॅट्रॉसिटी’कायद्याचं केवळ नावच अनेकांना माहिती आहे. पण त्यात नेमकं काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. हाच वास्तववादी विषय प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न निर्माते डॉ राजेंद्र पडोळे व दिग्दर्शक दिपक कदम यांनी केला आहे. आर. पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला ‘अॅट्रॉसिटी’ हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातात, पण ज्यांच्यासाठी कायदे बनतात त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते. ‘अॅट्रॉसिटी’ हा देखील एक असाच कायदा आहे, ज्याबाबत समाजात विशेष जागृती नाही. त्यामुळे समाजातील ज्या दुर्बल घटकांसाठी हा कायदा बनवण्यात आला ते याचा उपभोग घेऊ शकत नाही. अशा घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या कायद्यावर प्रकाशझोत टाकताना या कायद्याचा केला जाणारा दुरुपयोग यावर ‘अॅट्रॉसिटी’ चित्रपट भाष्य करणार आहे. ‘अॅट्रॉसिटी’ मध्ये मांडण्यात आलेल्या वास्तववादी कथानकामध्ये मनोरंजक मूल्यांचा समावेश करीत गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर,अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी ‘अॅट्रॉसिटी’मधील गीतं लिहिली असून, संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू-अरोरा, शशिकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव या गायकांनी या गीतरचना गायल्या आहेत. अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव,विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ, निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे,राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे, निखिल चव्हाण या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल ही नवी जोडी या चित्रपटात असणार आहे. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, मधू कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कलाकारांच्या निवडीची जबाबदारी राजेंद्र सावंत यांनी पार पाडली आहे, तर संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केलं आहे. बिरू श्रीवास्तव या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, विनोद बरई व राजेंद्र सावंत प्रोडक्शन कंट्रोलर आहेत.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite