Peoples Media Pune header

Go Back

महाशिवरात्री निमित्त भरत मित्रमंडळाच्यावतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन

13 Feb 2018

) महाशिवरात्री निमित्त नारायणपेठेतील भरत मित्रमंडळाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.यात शंकराची भव्य मूर्ती,ऋषी व भूतगण,ढोलताशा पथके,वारकरी पथक,चित्ररथ यांचा समावेश होता या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,चंद्रकांत मोकाटे,प्रशांत बधे,निलेश वावरे,मयूर कडू,राहुल पारखे,चंद्रभान पाटील,दिलीप ठोंबरे,तुषार गोगरी,परेश खांडके,पंकज जाधव,सचिन शितोळे.गणेशसर सपकाळ,संदीप पाटील,आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.ही मिरवणूक मोदी गणपती मंदिर ते केळकर रस्त्याने आप्पा बलवंत चौक,व नुमवी शाळेसमोरून पत्र्या मारुती रस्त्याने पुन्हा मोदी गणपती मंदिर अशी झाली.महाशिवरात्र उत्सवाचे  हे ४० वे वर्ष असून मंडळ विविध समाजिक सांस्कृतिक,व शैक्षणिक उपक्रम राबविते असे बाळासाहेब दाभेकर यांनी नमूद केले.

छायाचित्र:भरत मित्रमंडळ महाशिवरात्र मिरवणुकीतील शिवरथ   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite