Peoples Media Pune header

Go Back

स्व.इंदिराजी गांधी समाज मन्दिराच्या दुस-या मजल्याच्या कामाचे सदानंद शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन

16 Feb 2018

मंगळवारपेठ येथील माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी समाज मंदिराच्या दुस-या मजल्याच्या बांधकामाचे भूमिपूजन माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी व नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यास सुमारे १० लाख खर्च होणार आहे.तसेच गोसावी वस्ती २१३/२१४ मंगळवारपेठ यथील गल्लीबोळातील सिमेंट रस्त्यांच्या कामाचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले.यासाठी सुमारे १० लाख खर्च येणार आहे.या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी स्व.इंदिरा गांधी समाज मंदिराचा पहिला मजला १९९४ साली बांधण्यात आला तेव्हा आपल्याच हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते व दुसरा मजला वाढवत असतानाही आपल्याच हस्ते भूमिपूजन होत आहे हा विलक्षण योगायोग असल्याचे सांगितले.या प्रसंगी अबरार शेख,इक्बालदादा शेख,मंगेश साखरे,सतीश चव्हाण,राहुल धोत्रे,बबलू सय्यद,राकेश जगवाणी,मोहसीन खान,राहुल छेडा,सचिन कांबळे,आशाताई वाघमारे,राहुल धोत्रे,अनिता पोर्वेकर,आलमा राज.आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :स्व.इंदिराजी गांधी समाज मन्दिर विस्तारित मजल्याचे भूमिपूजन करताना सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite