Peoples Media Pune header

Go Back

संतप्त शिवसेना महिला आघाडी व शिवसैनिकांनी मारले छिंदमच्या प्रतिमेस जोडे

17 Feb 2018

नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवरायांबद्दल अनुद्गार काढल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिक व शिवसेना महिला आघाडीने श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरा समोरील चौकात जोरदार निषेध केला.यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी श्रीपाद छिंदम याच्या प्रतिमेस जोडे मारले.तसेच जोरदार घोषणा देवून लाखोली वाहिली. शिवरायांचा अवमान करणारा XXनाल छिंदम मुर्दाबाद,या Xक्क्या छिंदमचे करायचे काय ?खाली डोके वर पाय,X जडा छिंदम हाय हाय,तसेच जय भवानी जय शिवाजी,हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद व अन्य घोषणा देवून परिसर दणाणून सोडला,शेवटी छिंदमची प्रतिमा पायदळी तुडवून,फाडून फेकून देण्यात आली.या प्रसंगी महिला आघाडीच्या स्वाती कथलकर(कसबा महिला संघटक),सुलभा तळेकर,मनीषा धारणे,विजया जेधे,सविता थोरात,प्रभा सावंत,अनुपमा मांगडे,वृषाली दुबे,मनीषा गरुड,शहर संघटक गजानन पंडीत,नगरसेवक विशाल धनवडे,उपशहर संघटक उमेश गालिंदे,निरंजन दाभेकर,मयूर कडू,गणेशसर सपकाळ,राजेंद्र सोनार,राहुल पारखे,नितीन परदेशी,ज्ञानंद कोंढरे,ज्योतिबा शिर्के,चंदन साळुंखे,प्रशांत परदेशी,कैलास चातंदर,गोरख बांदल,सुरज मालुसरे,रमेश लडकत,बाळासाहेब गरुड,विलास नावडकर,देवेंद्र सोळंके,गणेश बिडकर,अनिल जाधव,जगदीश भणगे,कु.भणगे,राहुल जाधव,आदी मान्यवरांच्या बरोबरच नगरीक उपस्थित होते.यावेळी बोलताना गजानन पंडीत यांनी कोणत्याही परिस्थितीत छिंदम याची गय केली जाणार नाही असा इशारा दिला.विशाल धनवडे यांनी अजूनही शिवाजी महाराजांविषयी काहीजण बदनामीकारक कृत्ये,विधाने करीत आहेत याचा खेद वाटतो असे सांगितले.

छायाचित्र : छिंदमच्या प्रतिमेस जोडे हाणताना शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणी  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite