Peoples Media Pune header

Go Back

शिवजयंती निमित्त १३५ नागरिकांचे मरणोत्तर अवयव दान

09 Mar 2018

कोंढवा खुर्द येथे श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाने सालाबाद प्रमाणे यंदा ही चार दिवस शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.विशेष म्हणजे यंदा आयोजक श्रीकांत पवार यांनी समान्य नागरिकांमध्ये मरणोत्तर अवयव दान याविध्यी जागृती निर्माण व्हावी म्हणून फॉर्म भरण्याचे आवाहन केले.त्याला प्रतिसाद म्हणून १३५ नागरिकांनी फोरम भरले.एकाच ठिकाणी एकाच दिवसी इतके फॉर्म भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रसंगी अवयव दात्यांचा सन्मान करण्यासाठी मा.आ.महादेव बाबर यांच्या पत्नी स्मिता बाबर,नगरसेविका संगीता ठोसर,वरिष्ठ पो.नि.मिलिंद गायकवाड,गणेश कामठे,रमेश गायकवाड,भाग्यश्री पवार आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना श्रीकांत पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांच्या विचारा प्रमाणे जनहितार्थ उपक्रमाने व्हावी हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले.

छायाचित्र :अवयव दानाचे फॉर्म भरणाऱ्या दात्यांचा सत्कार करताना स्मिता बाबर,श्रीकांत पवार व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite