Peoples Media Pune header

Go Back

विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान महिलांना “ह्युमॅनिटी इंटरनॅशनल वूमन अचीव्हर अॅवार्ड २०१८”प्रदान

11 Mar 2018

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ह्युमॅनिटी एनजीओ,फर्जखान प्रॉडक्शन व आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ह्युमॅनिटी इंटरनॅशनल वूमन अचीव्हर अॅवॉर्डसने सन्मानित करण्यात आले.हॉटेल क्राऊन प्लाझा येथे हा समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाचे संयोजन कुमेल रझा(ह्युमॅनिटी एनजीओ)व फर्ज खान(फर्जखान प्रॉडक्शनयांनी केले.पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे रुबी अरुण(पत्रकार),रुबिका लियाकत(पत्रकार),अकरा अंजुम(पत्रकार),विनिता यादव(पत्रकार),सामाजिक कार्य-तिस्ता सेटलवाड,झरिना देशमुख,रिद्धिमा विरदी,राधिका वेमुला(स्व.रोहित वेमुलाच्या आई),मोहिनी श्रॉफ(माजी पायलट),श्रुती कुलकर्णी(रेडीओ जॉकी),रंजनाताई टिळेकर(कृषी),अनुप्रिया देवतळे(संगीत),कविता शेठ(संगीत),अनामिका ग्रोवर(संगीत),शिवानी वासवानी(संगीत),प्रियंका भाट (साहस),खुशबू अख्तर(उद्योग),दिप्ती वर्मा(उद्योग),अबेदा इनामदार(शिक्षण),शीतल ठाकूर(फॅशन),संगीता वाघमोडे(वैद्यकीय),जीवन गौरव पुरस्कार-उषा खन्ना(संगीतकार),७ खंड व ४५ देश प्रवास केलेल्या इराणच्या डॉ.मशाल येझर्लू यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शाल.श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना फर्ज खान यांनी विविध क्षेत्रात महिला उत्तुंग कामगिरी करीत आहेत.समाजाने त्यांचा सन्मान केला पाहिजे असे सांगितले.कुमेल रझा यांनी बोलताना पुरस्काराने पुढील काळात आजून कार्य करण्यास प्रेरणा मिळते असे सांगितले 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite