Peoples Media Pune header

Go Back

पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

14 Mar 2018

स्व.निवेदिता दीक्षित यांच्या स्मरणार्थ पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन,चरित्र प्रतिष्ठान व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यादव भवन शुक्रवारपेठ येथील असोसिएशनच्या मुख्यालयात हे शिबीर संपन्न झाले.विशेष म्हणजे शिबिरात ६५ व्ही जयराम यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले.सुमारे २८ सदस्यांनी रक्तदान केले.यात एक खेदजनक बाब समोर आली ती म्हणजे इच्छुक ५५ रक्तदात्यांपैकी फक्त २८ जन रक्तदान करू शकले कारण अन्य सदस्यांना उच्च रक्तदाब,मधुमेह व औषधे य करणामुळे रक्तदान करता आले नाही.म्हणजेच ५०% सदस्य आरोग्य समस्येने ग्रस्त आहेत.ही या व्यवसायातील ताणतणावाची देन असल्याचे मत अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी व्हीएए ग्रुपचे अध्यक्ष महेश घाडगे.अनिल दीक्षित व चार्टर्ड अकौंटंट सुरेश मेहता व्ही.आपटे.उमेश दांगट व करपे कुटुंबीय,नवनीतलाल बोरा,आदी मान्यवर उपस्थित होते.

 

छायाचित्र :६५ वर्षीय व्ही जयराम हे रक्तदान करताना सोबत मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite